सीगल सांस्कृतिक व क्रीडा मंडळ हे सेवाभावी आणि उत्साही स्वयंसेवकांचा संच आहे. मंडळाचे सर्व सदस्य विविध उत्सवांचे यशस्वी आयोजन करतात. मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक उत्कृष्ठ खेळाडू, उत्कृष्ठ आर्टिस्ट तसेच उत्कृष्ठ इव्हेंट मॅनेजमेंट कौशल्य आहे. मंडळ कायम नवीन स्वयंसेवकांना मंडळामध्ये समाविष्ठ करून घेते. तसेच सर्वांना योग्य संधी देण्यासाठी मंडळाची कार्यकारणी नियमित बदलत राहते. इच्छुक रहिवासी मंडळाशी संपर्क करून, मंडळ सदस्यांमध्ये समाविष्ठ होऊ शकतात.
मंडळाचे सर्व स्वयंसेवक आपल्या खाजगी आयुष्यातील मौल्यवान वेळ मंडळासाठी देतात. स्वयंसेवकानीं आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमुळेच रुणवाल सीगल संस्था, सभोवतालच्या परिसरामध्ये "सीगल फॅमिली - एक कुटुंब" म्हणून ओळखली जाते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांमधुम भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडते.
मंडळ संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांच्या योगदानाबद्दल कायम आभारी आहे.