गणेश उत्सव :
गणेश उत्सव हा सीगल सांस्कृतिक व क्रीडा मंडळाने आयोजित केलेला सर्वात मोठा उत्सव असतो. भारतीय संस्कृतीच्या विविधतेचे आणि परंपरेचे प्रदर्शन करत, तसेच भारतीय एकतेचे प्रतीक देत सर्व सीगल रहिवासी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होतात. गणेश उत्सव आणि त्यातील कार्यक्रम सोसायटीमधील रहिवाश्यांना भावनिक दृष्ट्या एकत्र आणण्यास मदत करतात. मंडळाने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी होतात. मंडळातर्फे सर्व रहिवाश्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, "सीगल गॉट टॅलेंट" च्या माध्यमातून स्टेज परफॉर्मन्सेस, आर्ट अँड क्राफ्ट स्पर्धा, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आणि इतर करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
गणेश उत्सवादरम्यान मंडळाकडून फूड तसेच इतर वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल आयोजित केले जातात. मंडळाकडून गणेश उत्सव काळात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. याच्या माध्यमातून सोसाटी रहिवाश्यांसाठी पूर्ण भोजन आणि महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. गणेश उत्सवादरम्यान सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक आणि महिला, भजन संध्येचे आयोजन करतात. यामुळे सोसायटी परिसराचे वातावरण प्रसन्न आणि मंत्रमुग्ध होते.
गणेश उत्सवाचा शेवट हा विसर्जन मिरवणुकीतून केला जातो. त्यानंतर मंडळातर्फे वार्षिक पारितोषिक वितरणाचे आयोजन केले जाते. मंडळातर्फे सोसायटीचे मान्यवर, स्पॉन्सर, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सन्माननीय व्यक्तींकडून पारितोषिकांचे आणि बक्षिसांचे वितरण केले जाते. पारितोषिक वितरण समारंभांसोबतच, सोसायटीमधील खऱ्या हिरोंचा सन्मान केला जातो. सामाजिक बांधिलकी जपत, सोसायटीतील अनेक रहिवासी विविध मार्गे समाजकार्यात सहभागी होत असतात. मंडळातर्फे या सर्व व्यक्तींचे आभार मानले जातात.
पारितोषिक वितरण समारंभानंतर दरवर्षी "चॅम्पियन्स ट्रॉफी" या फिरत्या चषकाचे हस्तांतरण करून, गुणतक्ता पुन्हा नव्याने सुरु केला जातो.