मंडळाचे आवश्यक खर्च भागवण्यासाठी मंडळ सोसायटीतील प्रत्येक सभासदाकडून वार्षिक वर्गणी घेते. मंडळाचे वार्षिक सर्व खर्च या एकदाच गोळा केलेल्या वर्गणीतून केले जातात.
मंडळाचा सर्व खर्च आवश्यक आणि गरजेनुसार केले जातात. वर्षाच्या सुरुवातीला मंडळ आपले आर्थिक नियोजन मांडते आणि त्यानुसार वार्षिक खर्च भागवला जातो. आर्थिक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याकरिता सर्व खर्चाचा वार्षिक ताळेबंद केला जातो
सन २०१९ साली मंडळाने, मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मंडळाच्या नोंदणीची औपचारिकता पूर्ण केली. त्यामुळे मंडळाने स्वतःचे "बँक खाते" उघडले असून, सर्व वार्षिक वर्गणी त्यात जमा केली जाते. .
मंडळाचे उत्पन्न स्रोत: :
• सभासदांची वार्षिक वर्गणी
• स्पॉन्सरशिप आणि जाहिरात
• स्टॉल
• गणेश मंडळातील दानपेटी
• अतिरिक्त कुपन
• बँक ठेवीवरील व्याज
मंडळाचे खर्च:
• महाप्रसाद आणि इतर जेवणांवरील खर्च
• खेळ स्पर्धा साहित्य, पारितोषिके, बक्षीस आणि मेडल्स
• टेबल, खुर्ची आणि इतर साहित्याचे भाडे, मजुरी आणि वाहतूक