SSKM मालमत्ता आणि साहित्य:
सीगल सांस्कृतिक मंडळाला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी विविध वस्तू तसेच साहित्यांची आवश्यकता भासते. अनेकदा हे साहित्य भाडेतत्वावर आणावे लागते, ज्यामुळे संस्थेचा पुष्कळ पैसे भाड्यावर खर्च होतो.
मोठ्या तसेच कायमस्वरूपी लागणाऱ्या साहित्यांच्या भाडेसाठी लागणारा खर्च टाळण्यासाठी मंडळाने काही साहित्य स्वतः खरेदी केलेले आहे. या साधनांचा वापर केवळ मंडळाच्या कार्यक्रमांसाठी तसेच सोसायटी परिसरातील कार्यक्रमांसाठीच केला जातो. मंडळाचे सर्व साहित्य सोसायटी परिसरातील योग्य ठिकाणी सुरक्षितपणे ठेवले जाते. तसीच या साहित्यांची नियमितपणे देखभाल केली जाते.
मंडळाची मालमत्ता आणि साहित्य यादी:
• लोखंडी कार्यक्रमाचे स्टेज चा सांगाडा
• गणेश मंडळ सांगाडा आणी संबंधित साहित्य
• म्युजिक सिस्टम, स्पीकर, मिक्सर, माईक आणि इतर उपकरणे .
• पारंपरिक वाद्ये. उदा - ढोल, ताशा, झाँज, टाळ आणि इतर साहित्य
• डेकोरेशन लाईट, हॅलोजन ब्लब, LED लाईट पॅनल, फॉग मशीन आणि इतर विद्युत उपकरणे
• बॅनर, बॅकड्रॉप आणि इतर सामग्री