SSKM बद्दल माहिती :
SSKM म्हणजेच
"सीगल सांस्कृतिक व क्रीडा मंडळ" . SSKM (पूर्वीचे नाव सीगल उत्सव समिती) हे सांस्कृतिक मंडळ २०१० साली सुरु आले. मंडळाचा मूळ उद्देश रुणवाल सीगल सोसायटी परिसरामध्ये सांस्कृतिक, धार्मिक तसेच क्रीडा उत्सवाचे आयोजन करणे हा आहे. मंडळामार्फत प्रत्येक वर्षी विविध सांस्कृतिक, धार्मिक सणाच्या उत्सवाचे तसेच अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.
SSKM ही धर्मदाय संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत कायदेशीर नोंदणीकृत संस्था असून तिचा रजिस्ट्रेशन क्रमांक “रजिस्ट्रेशन क्र: माह / १२७७ / २०१९ / पुणे” असा आहे. मंडळातर्फे प्रत्येक वर्षी शासनाच्या नियमानुसार निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे तसेच तरतुदींचे व आदेशांचे पालन केले जाते.
आम्ही काय करतो?
सीगल सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचा मुख्य उद्देश, संस्थेच्या परिसरामध्ये सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करणे हा आहे. मंडळ रुणवाल सीगल रहिवाश्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. सोसायटी रहिवाश्यांमध्ये भावनिक आणि कौटुंबिक वातावरण निर्माण करून मंडळ आपली सामाजिक जबाबदारी पार पाडते. "सीगल गॉट टॅलेंट" यासारख्या कार्यक्रमामधून संस्थेतील मुलांना आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. गणेश उत्सव काळात आयोजित केलेल्या अंताक्षरी, पाककला स्पर्धा, रांगोळी आणि अश्या इतर अनेक स्पर्धां महिला वर्गांसाठी खास आकर्षण असते.
गणेश उत्सव काळात, सोसायटीच्या ज्येष्ठ नागरिकांकडून भजन संध्येचे आयोजन केले जाते. ज्यामुळे संस्थेचे आणि परिसरातील वातावरण मंत्रमुग्ध होते. सीगल सांस्कृतिक व क्रीडा मंडळ संपूर्ण वर्षभरात विविध धार्मिक सण आणि उत्सवांचे आयोजन करते. सदर उत्सवांमधून भारतीय संस्कृतीचे, आणि विविधतेतून एकतेचे प्रदर्शन घडते. मंडळ वर्षभरात गणेश उत्सव, कोजागिरी पौर्णिमा, ईद, नवरात्री आणि दांडिया, ख्रिस्तमस, होळी आणि होलिका दहन यासारख्या सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन करते.
सीगल सांस्कृतिक व क्रीडा मंडळ, प्रत्येक वर्षी संस्थेतील रहिवाश्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करते. वर्षातील सर्व क्रीडा स्पर्धा "चॅम्पियन ट्रॉफी" या मुख्य स्पर्धेखाली घेतल्या जातात. विविध क्रीडा स्पर्धांमधून, सर्व लहान मुलांना तसेच स्पर्धकांना मैत्रीपूर्ण वातावरणात खेळाचा आणि स्पर्धेचा आनंद लुटता येतो. स्पर्धेत चुरस कायम राखण्यासाठी, सर्व रहिवासी ४ संघांमध्ये विभाजित केले जातात. प्रत्येक संघाचे स्वतःचे नाव, रंग (लाल, आकाशी, भगवा, हिरवा) आणि स्वतःचा लोगो असतो. प्रत्येक संघाला ३ कर्णधार असतात, ज्याची विभागणी १ प्रौढ, आणि १ मुलगा आणि १ मुलगी या गटातून घेतली जाते. यामुळे लहान मुलांमध्ये नेतृत्वगुण तयार होण्यास मदत होते.
चॅम्पियन्स ट्रॉफी च्या माध्यमातून सर्व रहिवाश्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होता येते. या स्पर्थामध्ये बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्विमिंग, सायकल स्पर्धा, स्केटिंग, वेव्ह बोर्ड, गोळाफेक, लांब उडी, धावण्याच्या स्पर्धा, तसेच इतर अनेक वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होता येते. तसेच मंडळातर्फे फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट यासारख्या सांघिक खेळाचे देखील आयोजन केले जाते.
क्रीडा स्पर्धांसोबतच मंडळ अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील करते. मंडळाने आतापर्यंत अनेक स्वच्छ सोसायटी मोहीम, झाले लावा झाडे जगावा, रक्तदान शिबीर, अमराठी लोकांसाठी मोफत मराठी शिकवणी, संस्कार शिबीर यासारख्या अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.