चॅम्पियन्स ट्रॉफी:
मंडळातर्फे आयोजित केलेल्या सर्व क्रीडा स्पर्धा, या चॅम्पियन्स ट्रॉफी या शीर्षकाखाली घेतल्या जातात. चॅम्पियन्स ट्रॉफी च्या बहुतांश स्पर्धा सोसायटी परिसरातच आयोजित केल्या जातात. तसेच गरजेनुसार काही स्पर्धांचे आयोजन सोसायटी परिसराबाहेर देखील केले जाते. मंडळातर्फे आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांमुळे मुलांमध्ये खेळभावना जागृत होते. तसेच विविध खेळांमधील कौशल्य वाढीस देखील मदत होते.
चॅंपियन ट्रॉफीचे हाउसेस:
स्पर्धेमध्ये चुरस निर्माण करण्याकरिता सोसायटीमधील सर्व रहिवाश्यांचे ४ हाऊस (टीम) मध्ये विभागणी होते. प्रत्येक हाऊस ला ३ कर्णधार (प्रौढ, किशोर गट - मुले, किशोर गट - मुली) असतील. हाऊस ची रचना खालीलप्रमाणे –
• हाऊस १ - रेड इंडियन्स - बिल्डिंग ए १ + ए २
|
|
|
|
हाऊस १ - रेड रेड इंडियन्स |
प्रमोद वाळुंजे फ्लॅट क्रमांक: ए १ - १२०१ प्रौढ गट |
हर्षित दादीच फ्लॅट क्रमांक: ए १ - ६०६ किशोर गट - मुले |
नक्षत्रा ढोरे फ्लॅट क्रमांक: ए २ - ८०६ किशोर गट - मुली |
• हाऊस २ - रॉयल ब्लु - बिल्डिंग ए ३ + ए ४ + रो हाऊस + शॉप्स + सोसायटी कर्मचारी
|
|
|
|
हाऊस २: निळा रॉयल ब्लु |
सपन शाह फ्लॅट क्रमांक: ए ३ - ८०४ प्रौढ गट |
जागा रिक्त जागा रिक्त किशोर गट - मुले |
जागा रिक्त जागा रिक्त किशोर गट - मुली |
• हाऊस ३ - ऑरेंज थंडरबर्ड - बिल्डिंग बी १ + बी २
|
|
|
|
हाऊस ३: केशरी ऑरेंज थंडरबर्ड |
श्याम सिंघल फ्लॅट क्रमांक: बी २ - ११०१ प्रौढ गट |
दक्ष रंजन फ्लॅट क्रमांक: बी १ - ३०२ किशोर गट - मुले |
सई जाधव फ्लॅट क्रमांक: बी २ - १२०६ किशोर गट - मुली |
• हाऊस ४ - ग्रीन विकिंग - बिल्डिंग बी ३ + बी ४ + बी ५
|
|
|
|
हाऊस ४: हिरवा ग्रीन विकिंग |
अतुल दिवेकर फ्लॅट क्रमांक: बी ३ - १२०१ प्रौढ गट |
आदित्य वर्धे फ्लॅट क्रमांक: बी ३ - १०६ किशोर गट - मुले |
हर्षिका पवार फ्लॅट क्रमांक: बी ३ - ७०३ किशोर गट - मुली |
चॅम्पियन्स ट्रॉफी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या खेळांची विभागणी २ प्रकारात केली जाते. वैयक्तिक खेळ आणि सांघिक खेळ.
वैयक्तिक खेळ:
ज्या खेळांमध्ये खेळाडू वैयक्तिक पातळीवर अथवा जास्तीत जास्त २ पर्यंत स्पर्धक सहभागी होतात, ते सर्व खेळ वैयक्तिक गटामध्ये मोडतात. वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, ऍथलेटिक्स, लॅबम उडी, गोळाफेक, सायकल स्पर्धा, स्केटिंग, वेव्ह बोर्ड, पोहणे यासारख्या खेळांचा समावेश होतो. प्रत्येक खेळासाठी विविध वयोगटानुसार तसेच महिला व पुरुष यानुसार अनेक उप-प्रकार तयार केले जातात. स्पर्धेतील चुरस आणि स्पर्धा कायम राखण्यासाठी, प्रत्येक खेळानुसार वेगळा वयोगट विचारात घेतला जातो.
सांघिक खेळ:
जे क्रीडाप्रकार संघ पातळीवर खेळले जातात, तसेच ज्या संघामध्ये ३ किंवा त्या पेक्षा अधिक खेळाडू असतात ते क्रीडा प्रकार सांघिक खेळामध्ये मोडले जातात. सांघिक खेळामध्ये मंडळाकडून बॉक्स क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, अंताक्षरी आणि इतर खेळ गणले जातात. सांघिक क्रीडा प्रकारासाठी, संघातले सर्व खेळाडू एकाच हाऊस मधील असणे बंधनकारक आहे. वेगळ्या हाऊस मधील खेळाडू सांघिक प्रकारात एका संघाकडून खेळू शकत नाहीत. तसेच डबल्स क्रीडा प्रकारासाठी सुद्धा दोन्ही खेळाडू एकाच हाऊस मधून असणे बंधनकारक आहे.
परंतु, जर एका व्यक्तीचे दोन विविध हाऊस मध्ये फ्लॅट / रो हाऊस / शॉप असतील, असा खेळाडू दोन्ही पैकी कोणत्याही एका हाऊस मधून सहभागी होऊ शकतो. अश्या स्थितीमध्ये सदर फ्लॅटधाकरकाचे पती, पत्नी, भाऊ, बहीण, मुले, आई-वडील किंवा तो व्यक्ती स्वतः असे थेट नाते असणे बंधनकारक आहे. परंतु काका-मामा-आजी-आजोबा-मित्र अथवा दूरचा नातेवाईक असे नाते मान्य केले जाणार नाही.
गुणतक्ता:
कोणत्याही क्रीडा प्रकारातील विजेता खेळाडू (सुवर्ण, रौप्य अथवा कांस्य पदक) आपल्या हाऊस साठी खालील प्रमाणे गुण कमावेल
विजेता क्रमांक |
पदक / बक्षीस |
वैयक्तिक क्रीडा प्रकार |
सांघिक क्रीडा प्रकार |
विजेता / प्रथम क्रमांक |
सुवर्ण |
100 |
150 |
द्वितीय क्रमांक |
रौप्य |
60 |
90 |
त्रितिय क्रमांक |
कांस्य |
40 |
60 |
जो हाऊस सर्व क्रीडा प्रकारातील एकूण गुणतक्त्यात सर्वाधिक गुण कमावेल, तो हाऊस त्या वर्षासाठी विजेता ठरेल. प्रत्येक वर्षी सर्व संघामध्ये फिरता चषक असेल. प्रत्येक वर्षीच्या विजेत्या संघाला तो चषक जिंकण्याचा सन्मान मिळेल. यासोबत, प्रत्येक वैयक्तिक क्रीडा प्रकारातील विजेत्या खेळाडूस वैयक्तिक चषक तसेच सांघिक क्रीडाप्रकारात प्रत्येक खेळाडूस वैयक्तिक पदक मिळेल. प्रत्येक क्रीडा प्रकारात, विजेता, उप-विजेता आणि उप-उप-विजेता (त्रितिय क्रमांक) असे विजेते घोषित केले जातील.
हाऊस कर्णधार:
प्रत्येक हाऊस साठी ३ कर्णधार असतील. एक कर्णधार प्रौढ गटातील, तर २ कर्णधार किशोर गटातील असतील (१ मुलगा आणि १ मुलगी). लहान मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी, प्रत्येक हाऊस मध्ये लहान मुलांच्या गटातून २ कर्णधार निवडण्यात आले आहेत. कोणत्याही कर्णधाराला पुढील वर्षी पुन्हा कर्णधार होता येणार नाही. प्रत्येक वर्षी नवीन कर्णधारांची नियुक्ती केली जाईल.
विजेते: २०२१-२२
|
|
|
|
विजेते २०२१-२२ ऑरेंज थंडरबर्ड |
श्याम सिंघल फ्लॅट क्रमांक: बी २ - ११०१ प्रौढ गट |
जय जाधव फ्लॅट क्रमांक: बी २ - १२०१ किशोर गट - मुले |
शिवांजली गायकवाड फ्लॅट क्रमांक: बी १ - ५०६ किशोर गट - मुली |
|
|
|
|
उप-विजेते २०२१-२२ ग्रीन विकिंग |
अतुल दिवेकर फ्लॅट क्रमांक: बी ३ - १२०१ प्रौढ गट |
सार्थक माळवे फ्लॅट क्रमांक: बी ३ - ५०५ किशोर गट - मुले |
रिया फरांदे फ्लॅट क्रमांक: बी ३ - ११०४ किशोर गट - मुली |
विजेते: २०२२-२३
|
|
|
|
विजेते २०२२-२३ ऑरेंज थंडरबर्ड |
श्याम सिंघल फ्लॅट क्रमांक: बी २ - ११०१ प्रौढ गट |
जय जाधव फ्लॅट क्रमांक: बी २ - १२०१ किशोर गट - मुले |
शिवांजली गायकवाड फ्लॅट क्रमांक: बी १ - ५०६ किशोर गट - मुली |
|
|
|
|
उप-विजेते २०२२-२३ रेड इंडियन्स |
प्रमोद वाळुंजे फ्लॅट क्रमांक: ए १ - १२०१ प्रौढ गट |
आयुष शर्मा फ्लॅट क्रमांक: ए १ - ८०१ किशोर गट - मुले |
अद्विका सिन्हा फ्लॅट क्रमांक: ए २ - ७०५ किशोर गट - मुली |